ढोकरी पक्षीला जीवदान

0
71

पिंपरी, दि. ९ ऑगस्ट (पीसीबी) – पिंपरीगाव येथे जखमी झालेल्या ढोकरी पक्षाला प्राणिमित्राने मोठ्या कष्टाने जीवदान दिले. संस्थापक/ हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशन,सामाजिक संस्थेचे सचिन जाधव यांनी त्याबाबतची माहिती दिली.आज रोजी रात्री ७:५० वाजता माझा मित्र प्रवीण शिर्के याने मला कॉल केला. त्यानं म्हंटले की आपल्या इथे पिंपरीगावत एक पक्षी आला आहे आणि तो इतर पक्ष्यान पेक्षा वेगळा दिसतो. हे ऐकल्यावर प्रथम काळजी म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले,कारण तो उडू शकत नव्हता. त्या नंतर सर्व काम सोडून प्रथम त्या पक्षिला प्राधान्य दिले.

तिथे गेल्यावर माझ्या लक्ष्यात आले की हा ढोकरी पक्षी आहे. इंग्रजी मध्ये त्याला Pond heron म्हणतात. पक्षी पाण्यातील कीटक,मासे खातो, हा पक्षी लांब स्थलांतर करत असतो. आपल्या येथे मे, जून मध्ये येत असतो. माझ्यासाठी हा निसर्गाचा ठेवाच आहे, म्हणून याला वाचवणे फार गरजेचे होते. विशेष म्हणजे हा उडत नव्हता. इंटरनल इंजुरीस असू शकते. ताबडतोब रीच पीपल या संस्थेला कॉल केला आणि या पक्षी विषय माहिती दिली.आताच या अशी विनंती केली आणि काही वेळातच रेसक्यु व्हेन पिंपरीगावातील नव महाराष्ट्र शाळेच्या चौकात आली. बरीच लोक जमा झाली त्या पक्षी ला पाहण्या साठी, या अगोदर सुद्धा मी बरेच पक्षी वाचवले आणि तेव्हा सुद्धा अशीच गर्दी होत असे. शेवटी निसर्ग याला जपणे हे माझे कर्तव्य आहे.