ड्रेसिंगच्या बिलावरून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यास मारहाण

0
107
crime

चिखली,दि. ६ (पीसीबी)

ड्रेसिंग करण्याच्या बिलावरून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 4) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास पाटीलनगर चिखली येथील ओपोल हॉस्पिटलमध्ये घडली.

विमल कुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर रोहिदास मोरे (वय 36, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या ओपोल हॉस्पिटलमध्ये आरोपी विमलकुमार हा बोटाला ड्रेसिंग करण्यासाठी आला. ड्रेसिंग करण्याच्या बिलावरून त्याने हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. ‘आता मी तुम्हाला दाखवतो’ असे म्हणून त्याने हॉस्पिटलमध्ये आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.