ड्रेनेजचे पाणी बंद करण्यास सांगितल्याने दांपत्यास मारहाण

0
99

आळंदी, दि. 4 (प्रतिनिधी)

घराच्या भिंतीलगत सोडलेले ड्रेनेजचे पाणी बंद करण्यास सांगितल्याने तिघांनी मिळून दांपत्यास मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) सकाळी खेड तालुक्यातील केळगाव येथे घडली.

दिनेश एकनाथ महाजन आणि दोन महिला (रा. हनुमानवाडी, केळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या भिंतीलगत ड्रेनेजचे पाणी सोडले होते. ते बंद करण्यास सांगितल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला काठीने, हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत दमदाटी केली. एका महिलेने फिर्यादी यांच्या हाताला चावा घेत दुखापत केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.