ड्रग माफिया ललित पाटील ससूनमध्ये राहण्यासाठी मोजायचा तब्बल १७ लाख

0
450

पुणे, दि. १० (पीसीबी) – ड्रग माफिया ललित पाटीलच्या चौकशी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ललित पाटीलने अवैद्यरित्या किती संपत्ती कमावली याचे पुरावे आता हळूहळू समोर येत आहेत. ड्रग्स प्रकरण अटक केल्यानंतर ललित पाटील वैद्यकीय कारण देत पुण्यातील ससून रुग्णालयात राहत होता. मात्र त्याठिकाणी तो फुकटात राहत नव्हता. त्यासाठी तो मोठी रक्क मोजत होता, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील दर महिना 17 लाख रुपये मोजत होता. पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे. विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. ड्रग्स विक्रीच्या पैशातून ललित पाटील ससून रुग्णालय प्रशासनाला हे पैसे देत होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मात्र एवढी मोठी रक्कम ललित पाटील ससून रुग्णालयात नेमकी कुणाला देत होता? ससून रुग्णालयात असताना ललित पाटील अनेक मॉल्स देखील फिरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ललित पाटीलच्या फॉर्च्युनरसह ३ कार पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ललित पाटील आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या मालमत्तांचा देखील शोध पोलिसांकडून सुरु आहे. ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून खरेदी केलेल्या प्लॉट तसेच फ्लॅटची माहिती पुणे पोलिसांच्या हाती आली आहे.
ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून स्वतःच्या नावे, कुटुंबियांच्या नावे, प्रेयसीच्या नावावर नाशिक शहर आणि जिल्ह्यात खरेदी केलेल्या मालमत्तांची यादी पुणे पोलिसांच्या हाती. तर ललित पाटीलच्या जप्त केलेल्या ४ कारची किंमत तब्बल ५० लाख रुपयांच्या घरात आहे.