मुंबई : मुंबईतील नालासोपाऱ्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील संतोष भवन येथे सावत्र वडिलांकडून होणार्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांवर मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
डोळ्यावर पट्टी बांधली अन्…
तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पुर्वेच्या संतोषभुवन येथील सर्वोदनय नगरच्या चाळीत 24 वर्षीय तरुणी रहते. सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. सोमवारी रमेश भारती याने शरीरसंबंधाची मागणी केल्यावर मुलीने हल्ला करायचे ठरवले. कृत्य करण्यास लाज वाटते असे सांगून तिने वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली . त्यानंतर अचानक वार करत गुप्तांग कापले.
दरम्यान, तश्याच रक्तबंबाळ अवस्थेत रमेश भारती घराबाहेर गेला असता मुलीने तेथेही गाठून त्याच्यावर सपासप वार केले. हा माझ्यावर लैंगिक अत्याचार करत होता म्हणून मी हल्ला केल्याचे तिने लोकांना सांगितले. यानंतर तुळींज पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.