डोळ्यादेखत हातचलाखी; एका लाखातले 70 हजार पळवले

0
271

चाकण, दि. ६ (पीसीबी): बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पैसे भरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी 70 हजारांचा गंडा घातला. नोटा नीट लाऊन देतो असे सांगून एक लाख रुपये घेत त्यातील 70 हजार रुपये हातचलाखीने काढून घेत फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र चाकण शाखा येथे घडली.

बाळू बबन मांडेकर (वय 48, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडेकर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रच्या चाकण शाखेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. बँकेत त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी गाठले. पैसे असे भरायचे नसतात. आम्ही तुम्हाला नोटा लाऊन देतो, असे म्हणून आरोपींनी मांडेकर यांच्या हातातून एक लाख रुपये घेतले. त्यातील 70 हजार रुपये हातचलाखी करून काढून घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.