डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा दणका ; जगाचे टॅरिफचे संकट टळणार?

0
3

दि.३ (पीसीबी) – भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगोदरच चर्चेत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने मोठा दणका दिलाय. न्यायालयांनी दोन मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांचे बेकायदेशीर घोषित केले आहेत. सध्या अमेरिकेत लोक हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परत जा…परत जा..अशा घोषणा या त्यांच्याविरोधात करत आहेत. त्यामध्येच आता थेट कोर्टाने त्यांच्या निर्णयाला बेकायदेशीर म्हटले.

कोर्टाने दिलेला पहिला निर्णय हा कॅलिफोर्नियातील लष्करी तैनातीशी संबंधित आहे. ज्याला फेडरल न्यायाधीश चार्ल्स ब्रेयर यांनी बेकायदेशीर घोषित म्हटले. त्यांनी पोसी कमिटॅटस कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले. दुसरा निर्णय आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले. फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ हा बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाला कोर्टाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.

शिवाय कोर्टाने अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, टॅरिफ हा फक्त ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासारख्या अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. अमेरिकेतही अनेक गोष्टींवर टॅरिफ लावल्याने महागाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतातून अमेरिकेत होणारी मोठी निर्णयात बंद झालीये. नफा कमी मिळत असल्याने अनेक भारतीय वस्तू या अमेरिकेच्या मार्केटपर्यंत पोहोचत नाहीत. भारताने अमेरिकेत जाणारी टपाल सेवा देखील बंद केली आहे.ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध होताना दिसतोय. जर खरोखरच ऑक्टोबर महिन्यात टॅरिफ बंद झाला तर जगाला मोठा दिलासा मिळेल.