दि.२(पीसीबी) -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. हेच नाही तर भारतावरील दबाव वाढण्यासाठी थेट अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने परमाणू हल्ला करण्याची धमकी भारताला दिली. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत पंगा घेण्याचे खरे कारण पुढे आलंय. टॅरिफ हे फक्त कारण आहे. स्वत: च्या फायद्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत पंगा घेऊन अनेक वर्षांचे भारत आणि अमेरिकेमधील संबंध खराब केली आहेत.
आता यावर अमेरिकेतूनही स्पष्टपणे बोलले जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये आपल्या कुटुंबाच्या व्यापाराला पुढे घेऊन जाण्यासाठी भारतासोबतचे संबंध खराब केले आहेत. सुलिवन यांनी एक मुलाखत दिली. त्यांनी म्हटले की, अनेक वर्षांपासून अमेरिकेने सर्वात मोठा लोकतंत्र देश भारत यांच्यासोबत संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न केली.
पुढे त्यांनी म्हटले की, ट्रम्प कुटुंबासोबत व्यावसायिक करार करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याने ट्रम्प यांनी आता भारताशी संबंध दूर ठेवण्याच निर्णय घेतला आहे. भारत अमेरिकेची मजबूत भागीदारीमुळे ट्रम्प यांना अडथळा निर्माण होत असल्याने त्यांनी टॅरिफवरून भारतासोबत संबंध खराब केले आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती होते की, भारत हा काहीही झाले तरीही त्यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून भारतासमोर ठेवलेल्या अटी या मान्य करणार नाही.
आपल्या हितासाठी फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत पंगा घेऊन दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतावर पहलगाम हल्ला होण्याच्या अगोदरच ट्रम्प यांच्या कुटुंबाकडून वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलसोबत करार केला. अनेक तज्ञांनी ट्रम्प कुटुंबाचा पाकिस्तानी व्यवसायातील सहभाग असल्याने ते भारतासोबत अशाप्रकारे वागत असल्याचा दावा केलाय.