दि.२५(पीसीबी) – डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून सर्वांना मोठा धक्का दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत, रशिया आणि चीन एकाच मंचावर आले. अमेरिकेच्या दादागिरी विरोधात अनेक देश हे थेट भूमिका घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून दावा करत आहेत, त्यांच्यामुळेच भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबले. त्यांनी मध्यस्थी केली नसती तर जगातील सर्वात मोठे युद्ध जगाला भारत आणि पाकिस्तानच्या माध्यमातून भोगावे लागले असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारावर दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना दावा केला की, ते नोबेल शांती पुरस्काराचे पूर्णपणे हक्कदार आहेत. त्यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानसह त्यांनी जगातील सात युद्ध थांबवली आहेत. त्यामुळेच त्यांना शांतीचा नोबेल पुरस्कार हा मिळाला पाहिजे. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या मागणीसंदर्भात अमेरिकेत एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये जास्त करून अमेरिकेतील लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. 49 टक्के लोकांना वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. मात्र, त्यापेक्षा जास्त म्हणजेच 51 टक्के लोकांना स्पष्टपणे वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही पाहिजे.