डोक्यात स्टीलचा बत्ता घालून वृद्ध महिलेचा खून

0
807

पिंपरी, दि. ७ (पीसीबी)- रुपीनगर येथे एका महिलेच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घालून खून केला आहे. हि घटना गुरुवारी (दि.6) सकाळी सव्वा करा ते पावणे बारा या कालावधीत घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा पोपट जगन्नाथ आमटे (वय 38 रा.रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शोभा जगन्नाथ आमटे (वय 68) असे मयत महिलेचे नाव असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई गुरुवारी सकाळी घरात एकट्या होत्या. त्यावेळी अज्ञातांनी घरात प्रवेश करून त्यांच्या डोक्यात घरातील स्टीलचा बत्ता घालून चाकूने वार करून त्यांचा खून केला. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.