डोक्यात रॉड मारून केले जखमी

0
118

हिंजवडी, दि. 29 – लोखंडी रॉडने मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली.

ॠतुराज गडाख आणि यशराज गडाख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहत. सुलतान समदानी शेख (वय 35, रा. शांतीविहार विज्ञान नगर, बावधन, पुणे) यांनी गुरुवारी (दि. 27) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अविनाश हे दोघेजण चांदनी चौक, बावधन येथे थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी गेटला आडवी गाडी लावली. आरोपी यशराज याने लोखंडी रॉडने अविनाश याच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले. तसेच जळजळ होणारा स्प्रे मारला. तसेच शिवीगळा करीत तुला संपवून टाकतो, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.