डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

0
107

पिंपरी, दि. 09 (पीसीबी) : तरुणाचा डोक्यात दगड व पेव्हींग ब्लॉक घालून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी पावणेसहाच्या सुमारास जुनी सांगवीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन केंद्राशेजारील रस्त्यालगत उघडकीस आली. मृत तरूणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृत तरूणाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे आहे.

सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन केंद्राशेजारील रस्त्यालगत एका तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या डोक्यात दगड व पेव्हिंग ब्लॉक घालून त्याचा खून केल्याचे समोर आले. मृत तरूणाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. सांगवी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.