डोक्यात डीग्गी पडून बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू

0
115

रावेत, दि. ५ (पीसीबी) – एका कामगाराच्या डोक्यात डीग्गी पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी दहा वाजता रावेत येथील बेलारोजा बिल्डींग या साईटवर घडली. रामप्रित यादव (वय 39) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मोहित गिरधारी साहू (वय 33) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान मारुती बेले (वय 50, रा. हडपसर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे आरोपी सोपान बेले याची बेलरोजा बिल्डींग नावाने एक बांधकाम साईट सुरु आहे. तिथे काम करणाऱ्या कामगारांना बेले याने सुरक्षेची साहित्य व साधने पुरवली नाहीत. दरम्यान गुरुवारी सकाळी काम करत असताना रामप्रित या कामगाराच्या डोक्यात डिग्गी पडून अपघात झाला. यात रामप्रित हे गंभीर जखमी झाले. तय्तच त्यांचा मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.