दि.२९(पीसीबी) -आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या निधनाने संतापलेल्या पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्रद्धांजली अर्पण करताना घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, संदेश नवले, अजय खराडे, चंद्रकांत लोंढे, आशा भोसले, प्रियंका सगट, प्रज्ञा जगताप, स्वाती शिंदे, सौरभ शिंदे, रोहित शेळके, जय ठोंबरे, तन्मेश इंगवले, ,गौरव चौधरी ,विशाल कसबे, प्रतीक जगताप जमीर शेख ,मयूर रोकडे, आदित्य जाधव,अनिकेत सोनवणे,शबाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या श्रद्धांजली सभेत बोलताना महिला काँग्रेस अध्यक्षा सायली नढे यांनी पोलीस यंत्रणेवर थेट बोट ठेवले. त्या म्हणाल्या, ‘‘पोलीसच भक्षक झाले आहेत.. सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा? डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक दुर्घटना नव्हे, तर राज्यातील कायद्याच्या राज्याची दयणीय अवस्था आहे. महाराष्ट्रात हगवणे प्रकरणासारख्या घटनांनी पोलीस दलाची विश्वासार्हता संपली आहे. इतर प्रकरणांमध्येही न्याय मिळत नाही, मग सामान्य नागरिक कुठे जाणार?’’ यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. मुंडे यांच्या फोटोसमोर दोन मिनिटे मौन पाळले आणि ‘न्याय मिळेपर्यंत लढू!’च्या घोषणा दिल्या.
युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी सांगितले, ‘‘ही घटना राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतीक आहे. फलटणसारख्या घटना वारंवार घडतात, पण दोषींना शिक्षा होत नाही. आम्ही रस्त्यावर उतरू आणि न्यायाची लढाई लढू.’महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कांबळे यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘‘डॉ. मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात अशा घटना वाढत आहेत, सरकार झोपले आहे का?’’











































