डॉ. राजेंद्र रबडे यांचे निधन

0
4

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि प्रख्यात निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र सदाशिव रबडे (वय – ६९) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
शहरातील नामांकित डॉक्टरांमध्ये डॉ. रबडे यांचे नाव अग्रभागी होते.
सर्व तज्ञ डॉक्टरांनी एकत्र येत चिंचवड स्टेशन येथे निरामय हॉस्पिटलची स्थापना केली. हॉस्पिटलच्या उभारणीत अगदी स्थापने पासून त्यांचे मोठे योगदान होते. रुग्णांमध्ये लोकप्रिय आणि अत्यंत दिलदार स्वभावाचे म्हणून त्यांची ख्याती होती.