– राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात डॉ.मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली
पिंपरी, दि. २8 (पीसीबी)
माजी भारत देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बहल म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून त्यांनी उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली.
तत्कालीन पंतप्रधान असतांना, डॉ.मनमोहन सिंहांच्या आधार कार्ड संकल्पनेचं कौतुक संयुक्त राष्ट्र अर्थात यूएनने केलं होतं, तसेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच ‘राईट टू एज्युकेशन’ (RTE) अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, याअंतर्गत ०६ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजातील मुलांना शैक्षणिक सवलततिचा निर्णय घेतला. तसेच २००५ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी माहिती अधिकार कायदा (RTI) संमत करून नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा अधिकार दिला. त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेली, आणि त्यास महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा असं नामकरण करण्यात आलं. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण या जागतिकीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली. २०११ साली तत्कालीन पंतप्रधान असताना डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहराला भारत देशातून “बेस्ट सिटी २०११” चा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे १३ वे आणि शीख समाजातील पहिले पंतप्रधान होते, पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारताना देश आर्थिक व बेरोजगारीच्या संकटामध्ये देश असताना जगातील प्रसिद्ध अर्थज्ज्ञांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची गणना व एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पंतप्रधान पदी निवड करण्यात आली होती. अशा या महान व्यक्तीस त्यांच्या पवित्र स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने आदरांजली वाहतो.
सदर कार्यक्रमानंतर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे तैल्यचित्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहामध्ये असाव असा ठराव सर्वांनुमते शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मांडला त्यास महिला अध्यक्षा कविता आल्हाट तसेच कार्याध्यक्ष संतोष बारणे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष संतोष बारणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक राजू बनसोडे, प्रकाश सोमवंशी, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, श्रीधर वाल्हेकर, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे, राजेंद्रसिंग वालिया, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष युसुफ कुरेशी, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे, अकबर मुल्ला, दीपक साकोरे, असंघटीत कामगार अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, बाबुराव शितोळे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हणे, बचत गट अध्यक्षा ज्योती गोफणे, स्मिता मस्करे, गोरोबा गुजर, माऊली मोरे, प्रमोद साळवे, कुमार कांबळे, बाबासाहेब चौधरी, समशेर सिंग माथेरू, जगजीत सिंग, सुरेंद्र सिंग बाला, जितेंद्र सिंग लोहित, संकेत लोखंडे, सचिन वाल्हेकर, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.