डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाहीत – अजित गव्हाणे

0
161

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पिंपरी, दि.१४ :- जगातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी लोकशाही शासनाचा स्वीकार केला. त्यासाठी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणि त्यांची एकच किंमत हा सिद्धांत दिला. ही राजकीय लोकशाही असली तरीही त्याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये व्हावे, असे त्यांना वाटत होते. तरच जगापुढे हा देश टिकेल अन्यथा अडचणीत येईल. यासाठी त्यांनी जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुधारणा व सर्वांगीण विकास करता येईल, अशी राष्ट्राला राज्यघटना दिली. डॉ. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली तसेच मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले, त्यांचे संपूर्ण जीवन हे प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाही. देशाला विकासाच्या दिशेने २१ व्या शतकात जावयाचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असे मला वाटते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अजित गव्हाणे बोलत होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, प्रसाद शेट्टी, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष संजय औसरमल, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, खजिनदार दिपक साकोरे, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, महिला चिंचवड वि.सभा अध्यक्षा संगीता कोकणे, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे, महिला प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, व्हीजेएनटी महिला अध्यक्षा निर्मला माने, महिला बचत गट अध्यक्ष ज्योती गोफणे, संदीपान झोंबाडे, सा.न्याय.कार्याध्यक्षा मिरा कांबळे, रवींद्र सोनवणे, गोरोबा गुजर, कुमार कांबळे, यश बोध, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, राजू चांदने, जितेंद्रसिंग लोहेत, सुरेंद्रसिंग बाला, लवकुश यादव, महिंद्रसिंग जबाल, बापू सोनवणे, विजय पोटे, प्रकाश दाभाडे, राजू कांबळे, व्ही.के.त्रिपाटी, बी.के.मोरे, प्रमोद अंग्रे, सरिता झिंब्रे, सतिष चोरमले,निलम खोजेकर, अश्विनी कांबळे, संपत पांचुदकर, दत्ता बनसोडे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शिक्षण पूर्ण केले आणि मेहनत आणि झोकून देऊन सुमारे ३२ पदवी संपादन केली. परदेशातून डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर ते मायदेशी परतले आणि त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी आवाज उठवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांचा धैर्याने सामना केला आणि प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून यश संपादन केले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाही.

कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरल यांनी केले.