“डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी…!” या निषेधार्थ मराठा समाजाचं मोठं पाऊल…

0
533

सांगली,दि.२५(पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान पाडल्या प्रकरणी दाखल झालेले ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घ्यावेत यासाठी सांगली जिल्ह्यातील पंधरा गावांनी बंद पाळला. तसेच मागण्यांच्या पुर्तेतेसाठी मराठा समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

सांगलीच्या बेडगे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडल्या प्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निषेधार्थ बेडगसह मिरज तालुक्यातल्या अनेक गावांनी आज कडकडीत बंद पाळला. त्यानंतर मराठा समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

मिरज तालुक्यातील बेडग मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडकाम प्रकरणाचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. कमान पाडल्या प्रकरणी गाव सोडून निघालेल्या दलित बांधवांच्या लॉंग मार्चनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सरपंच उपसरपंचांसह तिघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येतील तसेच आंदाेलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा मराठा समाजासह अमरसिंह पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य ,आरग, सांगली) यांनी दिला.