पुणे – शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मायबाप जनतेने हि निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
एक जबाबदारी ची भावना आहे, देशातील जनतेने निर्णय घेतल्याचे जाणवते. महागाई, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव यासारख्या अनेक विषयांवर या सरकारने जनतेची निराशा केली आहे. हे सरकार बदलायचे हा सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला आहे. या बदलाचा शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोणताही डमी उमेदवारी अर्ज भरणार नाही. आईच्या चरणावर डोकं ठेवून निघालो आहे. ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकता, निष्ठा हेतू निष्टता असते त्याच्या मागे सगळं जग त्याला यश देण्यासाठी उभे राहते अशा भावना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याअगोदर मध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहे.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विध्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात ही लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८ हजारांनी पराभव केला होता यावेळी देखील या दोघांमध्ये लढत होणार आहे.