फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत, तर दुसरीकडे डॉक्टर महिलेत्या आत्महत्येप्रकरणी नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या हत्येच्या आरोपांनंतर वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणी धक्कादायक खुलासे केले आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांनी डॉक्टर महिलेवर कधी? कोणत्या दिवशी? आणि किती वेळा झालाय… यावर मोठा खुलासा केला आहे.
व्यवस्थेने डॉक्टर महिलेच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण केली. त्या एक सशक्त महिला होत्या… पोलीस त्यांना वाचवतील… अशी त्यांची अपेक्षा होती… पण पोलीस डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचे कारण आहेत. पोलीसच भक्षक झाले तर, राज्याचे काय हाल होतील हे डॉक्टर महिलेच्या रुपात आपल्या समोर आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, डॉक्टर महिलेवर बलात्कार झालाय आणि तो गोपाळ बदनेने केलाय. डॉक्टर महिलेवर पहिला बलात्कार 15 जून 2025 रोजी झाला. दुसरा बलात्कार 10 जुलै 2025 रोजी झाला. तिसरा बलात्कार 5 ऑगस्ट 2025 रोजी झाला… चौथा बलात्कार 20 सप्टेंबर 2025 मध्ये झाला… यादरम्यान डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल आणि धमकावण्याचं काम करण्यात आलं. यामध्ये प्रशांत याचं देखील नाव समोर आलं आहे, ज्याने डॉक्टर महिलेचा मानसिक छळ केला. मारहाण आणि अपमानित केलं.. आत्महत्येबद्दल सांगायचं झालं तर, ही आत्महत्या नाही तर, हत्या आहे.. असं देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी वर्षा गायकवाय यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला कारण घटनेच्या दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री फलटण येथे गेले आणि सभेत त्यांनी रणजित निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं वक्यव्य केलं. यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘डॉक्टर महिलेने सतत पत्र लिहिले… मदतीसाठी याचना केली… अशात कोणतीच चौकशी न करता क्लिन चीक कशी दिल? फडणवीस यांना कोणाला वाचवायचं आहे? हा माझा प्रश्न आहे… आरोपींना क्लिन चीट देण्याची देवेंद्र फडणवीस यांनी सवय झाली आहे…’ असं देखील वर्षा गायकवाड म्हणाल














































