डॉक्‍टरला दमदाटी करणार्‍या १५ जणांवर गुन्‍हा दाखल

0
84

पिंपरी, दि 0 ९ (पीसीबी)

साप चावलेल्‍या रूग्‍णालया रुग्‍णवाहिका का दिली नाही, असे म्‍हणत डॉक्‍टरला दमदाटी करीत १५ जणांच्‍या टोळक्‍याने गोंधळ घातला. ही घटना खेड तालुक्‍यातील पाईट येथील आरोग्‍य केंद्रात ४ सप्‍टेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास घडली.

डॉ. सोनम भीमराव रणवीर (वय ३४, सध्‍या रा. शासकीय निवासस्‍थान, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाईट, ता.खेड जि.पुणे) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नवनाथ दरेकर, प्रमोद माणिक खेगले, राजेंद्र बाबुराव पापळ, विशाल शंकर केदारी (सर्व रा. पाईट, ता.खेड, जि. पुणे) व त्‍यांचे ११ साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ४ सप्‍टेंबर रोजी फिर्यादी या पाइट येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात रुग्‍ण तपासत होते. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या आरोपीं यांनी गोंधळ घालत पेशन्टला साप चावला असताना तुम्ही त्यास रुग्‍णवाहिका का दिली नाही, या कारणावरुन फिर्यादी डॉक्‍टरांच्या अंगावर धावून आले. आत्‍ताच्‍य आत्‍ता रुग्‍णवाहिका चालकाची बदली करा, नाहीतर आम्‍ही तुमची बदली करू, अशी धमकी देवून ओपीडीचे कामकाज थांबवून शासकिय कामात वडा निर्माण केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.