डॉक्टरकडे १३ हजार नग्न व्हिडीओ सापडले

0
242

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी) – अमेरिकेत एका भारतीय डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. लहान मुली, महिलांचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना या डॉक्टरकडे १३ हजार नग्न व्हिडीओ सापडले आहेत. मागच्या सहा वर्षांपासून हा डॉक्टर हे व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पोलिसांनी या डॉक्टरकडून १५ इतर उपकरणंही जप्त केली आहे. उमैर एजाज असं या डॉक्टरचं नाव आहे.

डॉ. उमैर एजाज हा मेडिसीनचा डॉक्टर आहे. २०११ मध्ये तो Work Visa घेऊन अमेरिकेत गेला होता. त्याने निवासी डॉक्टर म्हणून Sinai Grace रुग्णालयात त्याची इंटर्नशीप पूर्ण केली. त्यानंतर हा डॉक्टर अलाबामा येथील डाऊसन या ठिकाणी काही वर्षे राहिला. तिथून तो मिशिगन या ठिकाणी आला आणि त्याची प्रॅक्टीस करत होता. त्याने आत्तापर्यंत विविध रुग्णालयांमध्ये औषधांमधला तज्ज्ञ डॉक्टर म्हणून काम केलं आहे.

एजाज उमैरला पोलिसांनी ८ ऑगस्टला अटक केली. त्याने रुग्णालयाच्या खोल्या, बाथरुम, कपडे बदलण्याच्या खोल्या या ठिकाणी छुपे कॅमेरे लावले होते. एवढंच नाही तर त्याने त्याच्या घरातही छुपे कॅमेरे लावले होते. या कॅमेरांच्या आधारे जे टिपलं गेलं आहे ते व्हिडीओ भयंकर डिस्टर्बिंग आहेत. महिला आणि लहान मुलींचे असे हजारो व्हिडीओ आहेत ज्यात त्या नग्न आहेत. अगदी दोन वर्षांच्या लहान मुलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंतचे व्हिडीओ यात पोलिसांना आढळून आले आहेत. ज्यानंतर डॉ. एजाज उमैरवर कारवाई करण्यात आली आहे. त्याने काही व्हिडीओ क्लाऊड स्टोअरेजमध्येही सेव्ह केले आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

एजाजच्या पत्नीने याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे या डॉक्टरच्या घरी छापा मारण्यात आला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.एजाज उमैरच्या नावे याआधी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. १३ ऑगस्ट रोजी त्याच्यावर एका महिलेचा न्यूड व्हिडीओ काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण उघडकीस आलं. मागच्या सहा वर्षांमध्ये या डॉक्टरने सुमारे १३ हजार व्हिडीओ तयार केले आहेत. या महिला आणि मुली अज्ञात आहेत. मात्र हे डॉ. एजाजचं हे कृत्य विकृतीचा कळस गाठणारं आहे अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. आम्हाला जे समजलं आहे त्यावरुन असा अंदाज आहे की हिमनगाचं एक टोक फक्त हाती लागलं आहे. त्याने काय काय व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत हे जाणून घेण्यासाठी बहुदा काही महिने जातील अशी माहिती ऑकलंड काऊंटीचे शेरीफ माईक बुचर्ड यांनी दिली आहे.