डॉक्टरकडून बनावट पिस्टल दाखवत मारण्याची धमकी

0
79

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) पिंपरी, – बनावट पिस्टलचा धाक दाखवून एका व्यावसायिकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी नाना पार्क, मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

इरफान शमशुद्दीन चौधरी (वय ३४, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. सचिन शशिकांत बोधनी (वय 49, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी हे मासुळकर कॉलनी रोडवरील नाना पार्क मोरवाडी येथे त्यांच्या भाच्याची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ आरोपी आला. त्याने ‘तुझ्यामुळे ट्राफिक जाम झाले आहे’ असे म्हणत बनावट पिस्टलचा धाक दाखवला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत मारण्याची धमकी देऊन निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.