पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना पूर्णतः खिळखीळी झाली असून ताकदिचे नेते पक्ष सोडून चाललेत. दरम्यान, एप्रिलमध्ये महापालिका निवडणूक होणार असल्याने भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच काही प्रमाणात शिंदेंची शिवसेना जोरदार तयारी करत असताना ठाकरेंची शिवसेना पराभवातून सावरण्याच्या मनस्थितीत नाही. शिवसेना संघटक एकनाथ पवार यांनी शुक्रवारी संघटनेचा राजीनीमा दिला आणि पाठोपाठ रावेत परिसरातील ताकदिचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही जय महाराष्ट्र केला. नेत्यांचे दुर्लक्ष असल्याने जुन्या निष्ठावंतांपकी अनेक जेष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारीसुध्दा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे २७ जानेवारीला शिवसैनिकांच्या भेटीला येणार आहेत.
विधानसभा निवडणुकिला महाआघाडीच्या जागा वाटपात भोसरी, पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघापैकी एक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा शिवसैनिकांचा आग्रह होता. प्रत्यक्षात तीनही मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सोपविण्यात आले. शिवसेनेच्या ताकदिचा विचार केला गेला नाही म्हणून सर्व शिवसैनिक नाराज झाले आणि प्रचारापासून अलिप्त राहिले. परिणामी राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले चिंचवडचे राहुल कलाटे, पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंत आणि भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा पराभव झाला. आगामी काळात महापालिका निवडणूक
संघटनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने
शिवसेना स्वबळावर नव्हे आघाडीत ? –
दरम्यान, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची आणि ताकद आजमावायची घोषणा आठवड्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली. बहुसंख्य नेते आणि शिवसैनिकांनी त्यावर नाराजीचा सूर लावला. भाजपकडे सर्व यंत्रणा, ताकद असताना स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे सोपे नाही, महाआघाडी केली पाहिजे असा सूर उमटला. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधूनही महाआघाडी म्हणून भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सामोरे गेले पाहिजे, अशी आग्रही मागणी पुढे आली. उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सोमवारी त्याबाबत बैठक झाली. आता शिवसैनिकांना त्याबाबत काय वाटते याचा कानोसा घेण्याचे काम सुरू आहे. खासदार संजय राऊत हे त्याबाबत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.