डुडुळगावातील लॉजवर सुरु होता वेश्या व्यवसाय

0
454

डुडुळगाव, दि. २५ (पीसीबी) – डुडुळगावातील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिघी पोलिसानी कारवाई करून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) सायंकाळी पावणे सात वाजता डुडुळगाव येथे करण्यात आली.

दिनेश अन्नू पुजारी (वय 41), सुरज प्रेम तमांग (वय 29, दोघे रा. डुडुळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुडुळगाव येथील एका लॉजवर आरोपींनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला आणि त्यातून आलेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिघी पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली. 10 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला असून एका महिलेची सुटका केली आहे.