डी वाय पाटील रुग्णालयात कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांना धक्काबुक्की

0
339

पिंपरी, दि. 29 – पिंपरी मधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात तातडीक विभागात कर्तव्यावर असलेल्या पुरुष परिचारक, महिला सुरक्षा रक्षक आणि एका डॉक्टरला धक्काबुक्की करून शिवीगाळ करत राडा घातल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 27) पहाटे दोन वाजता घडला.

अजय सदानंद मोरे (वय, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम दिलीप नरुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरुडे हे डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात तातडीक विभागात पुरुष परिचारिका म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे दोन वाजता आरोपी मोरे हा रुग्णालयात आला. त्याने नरुडे यांना ‘तू पहिले ट्रीटमेंट तर कर. सलाईन लाव. अगोदर पैशेच मागतो काय’ असे म्हणत शिवीगाळ, आरडा ओरडा केला. डॉ. नवमान खान यांना धक्काबुक्की करून नरुडे यांची कॉलर पकडली. सुरक्षा रक्षक महिलेला धक्का देऊन त्यांना खाली पाडले. त्यात त्या जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.