दि . 23 ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखडा त्वरित रद्द करावा आणि थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर, रहाटणी येथील रहिवाशी नागरिकांच्या जमिनी फ्री होल्ड करून त्यांचे प्रॉपर्टी कार्ड त्वरित द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या वतीने थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालय येथे १६ जुलै पासून चालू झालेला घराचा सत्याग्रह,साखळी उपोषणास मंगळवार २२ जुलै रोजी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
हे सरकार उपोषणाची दखल घेणारे नाही,या सरकारला मनगटाची भाषा समजते,त्यासाठी उपोषण स्थगित करून मोठा लोकलढा उभारून आपल्या मनगटाच्या जोरावर आपला प्रश्न सोडवला पाहिजे, हे भांडवलदारांचे, बिल्डर धार्जिने सरकार आहे.त्यामुळे हे साखळी उपोषण स्थगित करण्याचे आवाहन उपोषण करते धनाजी येळकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोळसे पाटील यांनी केले. कोळसे पाटील पुढे म्हणाले या घरावर टाकलेल्या डी पी च्या विरोधात महिलांचा मोठा पुढाकार हवा,मोठे आंदोलन उभे करा मी तुमच्यासाठी मारायला तयार आहे.आणि शपथ घ्या हा डी पी होईल तर आमच्या मढ्यावरून आणि प्रत्येकाने पुढे येऊन लढायला सुरुवात करा तेव्हाच घरांवर टाकलेला हा रिंग रोड आणि रस्ते थांबतील.सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले.
आज साखळी उपोषण स्थगित जरी करीत असलो तरी हा लढा प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळे ३५ ते ४० वर्ष प्रलंबीत असलेल्या या गंभीर प्रश्नाचे राजकारण करत कायम फसवणूक करणाऱ्या येथील लोकप्रतिनिधी,महापालिका प्रशासन, आणि राज्यसरकार यांच्या विरोधात आज पासून निषेध म्हणून प्रश्न मार्गी लागेपर्यंत घरावर काळे झेंडे लाऊ.यांनी समन्वय साधून येत्या १५ ऑगस्ट पर्यंत प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा १६ ऑगस्ट पासून यांच्या विरोधात चले जाव चळवळ उभी करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू असे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील म्हणाले.
यावेळी समन्वयक शिवाजी इबीतदार, मनोज पाटील,देवेंद्र भदाणे, गौरव धनवे,काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ज्ञानेश्वर मलशेट्टी,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राहुल कलाटे,प्रवक्ते माधव पाटील धनवे,शिवसेना(उ.बा. ठा.) गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील,हरेश नखाते, संदीप भालके, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष सतीश काळे, प्रविण कदम, राजू पवार,प्रमोद शिंदे, विशाल बारणे,रामचंद्र ढेकळे, किशोर पाटील, बालाजी ढगे, कुणाल महाजन,राजश्री शिरवळकर, अर्चना मेंगडे, पल्लवी साळुंखे, यशोदा पवार, फरिदा कुरणे, प्रतिभा कांबळे, अश्विनी पाटील, सुरेखा बहिरट, चंद्रकला नवाडे, नीलम सांडभोर,छावाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष राजन नायर, सचिन भिसे,व्यापारी संघटनेचे अंगद जाधव, मारुती निंबाळकर, नयना नारखेडे,कल्पना निंबाळकर, नकुल भोईर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.