‘डीम्ड कन्व्हेयन्स’ वर शनिवारी सोसायटी रहिवासी मेळावा

0
272

पिंपरी, ता. १५ (पीसीबी) -महाराष्ट्र राज्य सरकारचे सहकार खाते, ऍड. प्रज्ञा पाटील आणि तिरुपती इंडस्ट्रियल सर्विसेस प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ( ता. १७ सप्टेंबर, २०२२) रोजी ‘ मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स), सोसायट्यांचा पुनर्विकास, वाहनतळ (पार्किंग), सोसायटी देखभाल ‘ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील एस. के. एफ. एम्प्लॉइ हॉल येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री. अनिल कवडेसाहेब, जिल्हा उपनिबंधक श्री. नारायण आघावसाहेब, सहकारी संस्था पुणे शहर ३ चे उपनिबंधक श्री. नवनाथ अनपटसाहेब हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता श्री. विजय भोजने यांचे ‘ सोसायट्यांचे पार्किंग ‘ या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.