पुणे,दि.२५(पीसीबी) – कंपनीत तयार केलेला माल गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी गाडीत भरून दिला. त्या मालाचा चालकाने आणि त्याच्या साथीदारांनी अपहार केला. ही घटना सोमवारी (दि. १९) रात्री साडेआठ ते मंगळवारी (दि. २०) दुपारी बारा वाजताच्या कालावधीत वासुली फाटा येथे घडली.
प्रकाश निशिकांत गनबोटे (वय ४२, रा. कात्रज, पुणे) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालगीर आनंद गिरी (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड) आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गनबोटे यांच्या अॅडवीक हायटेक प्रा लि या कंपनीत तयार केलेले पाच हजार २८० अॅल्युमिनियमचे ब्रेक लिव्हर १० बॉक्समध्ये सीलबंद करून कार्गो ट्रान्सपोर्टच्या टेम्पोतून चिंबळी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी पाठवले. रस्त्यात आरोपी चालकाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून टेम्पोमधून एक हजार ९३० ब्रेक लिव्हरचे ४७ हजार ८३१ रुपये किमतीचे नग काढून अपहार केला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.