डिलरशिप देण्याच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणूक

0
355

पिंपरी दि. १७ (पीसीबी) -आयटीसी कंपनीच्या सर्व उत्पादनांची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने स्टेशनरी दुकानदाराची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा याप्रकारे जानेवारी ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत च-होली बुद्रुक येथे घडला.

सागर दिलीप ढोरजे (वय ३८, रा. च-होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १६) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9734252067 या नंबरवरून फोन करणारे शशांक अगरवाल, 9903586950 या नंबरवरून फोन करणारे संजीवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे स्टेशनरी दुकान आहे. त्यांना आरोपींनी फोन करून आयटीसी लिमिटेड कंपनीच्या सर्व उत्पादनांची डिलरशिप मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. सिक्युरिटी अमाऊंट म्हणून फिर्यादी यांना दोन बँक खात्यांमध्ये पाच लाख ९६ हजार ४०० रुपये भरण्यास सांगितले. त्यांनतर आयटीसी लिमिटेड कंपनीची खोटी कागदपत्रे बनवून त्यांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.