बावधन,दि .7 (पीसीबी)
भाडेकरूने सुरुवातीला दिलेले डिपॉझिट परत न देता भाडेकरूची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बाणेर येथे घडली.
याप्रकरणी ५१ वर्षय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिस्टर जोडी आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना एक लाख ३५ हजार रुपये डिपॉझिट दिले होते. फिर्यादी यांनी फ्लॅट सोडण्यापूर्वी एक महिला आरोपींना माहिती दिली. तरी देखील आरोपींनी डिपॉझिटची रक्कम परत न देता फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.














































