पिंपरी ,दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व अंदाधुंद कारभारामुळे मृतदेहाची अदलाबदल झाली. डिन हटाव, वायसीएम बचाव अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड युवा सेनेने डिनच्या निलंबनाची मागणी केली. याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व अंदाधुंद कारभारामुळे मृतदेहाची अदलाबदल झाली. संतप्त नातेवाईकांनी याबाबत जाब विचारत तक्रार करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांकडे धाव घेण्यात आली. परंतु वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळाली, याचा अर्थ वैद्यकीय अधीक्षक या प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. यापूर्वीही रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये सुद्धा काही प्रमाणात निष्काळजीपणा कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा दिसून आला. परंतू, ही बाब अतिशय गंभीर असून सबंध महाराष्ट्रातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. त्याबाबत आपण दोषी कर्मचाऱ्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाबळे यांचे त्वरीत निलंबन करण्यात यावे याबाबतची मागणी अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आली.
त्याप्रसंगी चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी उपविधान सभा अधिकारी अविनाश जाधव , नितिन पाटिल युवासेना समन्वयक चिंचवड विधानसभा,राजेश पाटिल, विशाल भातंबरेकर, सैपन मुजावर, निजाम मुजावर उपस्थित होते.