डिजिटल लॉक उघडून साडेआठ लाखांची घरफोडी

0
93

भोसरी, दि. २६ (पीसीबी) : डिजिटल लॉकचा नंबर टाकून चोरट्याने आठ लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी साडेअकरा वाजताच्‍या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे उघडकीस आली.

विजय विष्णु फुगे (वय 56 रा. विष्णुकृपा निवास, दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 19 ते 24 सप्‍टेंबर दरम्‍यान फिर्यादी यांचे बेडरूम डिजिटल लॉक लावून बंद होते. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने डिजीटल लॉक नंबर टाकून दरवाजा उघडला. आतील कपाटात ठेवलेले आठ लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हि-याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.