डाॅ.प्रकाश ठोंबरे यांनी मिळवला आर्यनमॅन किताब

0
3

निगडी प्राधिकरण येथील रहिवाशी व पुणे येथील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील स्वस्थवृत्त व योग विभागातील विभाग प्रमुख डाॅ.प्रकाश ठोंबरे यांनी मलेशियातील लंकावी येथे 1 नोव्हेंबर रोजी आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा 15 तास व 27 मिनिटांत पूर्ण करून आयर्नमॅन किताब पटकावला.
या मधे त्यांनी 3.8 किमी. स्विमिंग 1तास 40 मिनिटांत; 180 किमी. सायकलिंग 7 तास 41 मिनिटांत व 42.2km रनिंग 5 तास 42 मिनिटांत पूर्ण करून अतिशय खडतर अशी ही स्पर्धा पूर्ण केली.
या पूर्वी त्यांनी साऊथ अफ्रिकेतील 90 किमी. ची काॅम्रेड मॅरेथॉन सलग चौथ्यांदा 9 जून 2025 रोजी पूर्ण केली होती व त्यानंतर 1 जुलैपासून आयर्नमॅन स्पर्धेसाठी सराव सुरू केला होता. विशेष म्हणजे या आयर्नमॅन स्पर्धेचा सराव त्यांनी स्वतःच प्लॅन बनवून व तो शिस्तबद्धपणे पालन करून पूर्ण केला.