डांगे चौकातून रिक्षा चोरीला

0
78

दि. २० ऑगस्ट (पीसीबी )वाकड,
डांगे चौकातील ब्रिज खाली पार्क केलेली रिक्षा चोरट्याने चोरून नेली. ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली.

अक्षय भागवत जाधव (वय 28, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांनी त्यांची रिक्षा (एमएच 14/जेसी 5978) डांगे चौकातील माई वडेवाला समोरील पुलाखाली पार्क केली होती. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांची एक लाख 30 हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.