चिंचवड ,दि.०८(पीसीबी) – कोतवाल नगर किवळे येथे 5 ते 6 दिवस एक कुत्र्याचे चॉकलेट च्या बरणी मध्ये तोंड अडकले होते परंतु कुत्रे सापडत नव्हते आज सकाळी 7.30 च्या सुमारास पुणे अग्निशमन दलाचे जवान ऋषिकेश जरे व त्रिशूल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना कुत्र एका स्विफ्ट गाडी खाली बसलेले आढळून आले त्याच वेळी ऋषिकेश जरे यांनी पिंपरी चिंचवड फायर ब्रिगेड ला कॉल केला परंतु फायर ब्रिगेड ची मदत येण्याच्या आधी कुत्रे गाडी खालून पळायला लागले त्यावेळी फायरमन ऋषिकेश जरे व त्रिशूल मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी कुत्रे पकडून ठेवले. सदर कुत्र्याचे तोंड पूर्ण पणे सडायला लागले होते.अग्निशामक दलाची मदत आल्यानंतर त्यांनी व राजेंद्र तरस यांच्या प्रयत्नाने डॉग रेस्कू करणार्यां कर्मचार्यांना बोलवून घेतले व त्यांनी कुत्र्याला उपचारासाठी घेऊन गेले. नागरिकांच्या सतर्कते मुळे वाचले एका मुक्या प्राण्याचे जिव.