डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
104

चाकण, १७ जुलै (पीसीबी) -भाम फाटा, चाकण येथे भरधाव डंपरने एका महिलेला धडक दिली यामध्ये महिलेचा मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी (दि. 16) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडला.कुसुम नाथा गावडे (रा. पिंपळे निलख) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती नाथा यशवंत गावडे (वय 55) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक गणेश कमलेश्वर राय (वय 29, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी रस्त्याने पायी चालत जात होत्या. भाम फाटा येथे भरधाव आलेल्या एका डंपरने (एमएच 14/एलके 2422) नाथा आणि त्यांच्या पत्नी कुसुम यांना धडक दिली. त्यामध्ये कुसुम यांचा मृत्यू झाला. तर नाथा गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.