डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू..

0
370

आळंदी, दि. २ (पीसीबी) – डंपरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेसात वाजता के के हॉस्पिटल आळंदी येथे घडला.अलका रामदास गरुड (वय ५८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तुषार रामदास गरुड (वय २८, रा. रहाटणी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका या मंगळवारी रात्री साडेसात वाजता के के हॉस्पिटल आळंदी येथून पायी चालत जात होत्या. त्यांना एका डंपरने जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अलका यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता डंपरचालक निघून गेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.