डंपरच्या धडकेत पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी

0
222

खेड, दि. ०३ (पीसीबी) – सायकल खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलाला डंपरने धडक दिली. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी खुर्द ते काळूसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.

देवांश संदीप भोकसे (वय 5) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप तुकाराम भोकसे (वय 40, रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 11/डीडी 0170) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा वाकी खुर्द ते काळूसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घराजवळ सायकल खेळत होता. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने मुलाच्या सायकलला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.