डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
199

तळवडे, दि. १३ (पीसीबी) – डंपरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या वडील व मुलाला जोरदार धडक दिली यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.12) सायंकाळी त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिंद्रा कंपनीचा डंपर (एमएच 14 एचयू 9279) वरील चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. नवनाथ भानूदास गायकवाड (वय 35) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती व त्यांचा 16 वर्षीय मुलासह दुचाकीवरून तळवडे रोडने जात असताना आरोपी त्याच्या ताब्यातील डंपर वेगाने घेऊन जात होता. त्याने वाहतूकी कडे दुर्लक्ष करत फिर्यादीच्या पतीच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डंपर चालक तेथे न थांबता पळून गेला. चिखली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.