ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून शिंदे गटाचा आटापीटा

0
2

दि . ४ ( पीसीबी ) – महाराष्ट्रातल्या राजकारणातला उद्याचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. मराठी माणसाच्या जीवनातला ऐतिहासिक आणि आनंदी असा दिवस आहे. मराठी विजय दिवस म्हणून आहे तसाच तो महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात नवे बदल घडवणारा दिवस आहे. उद्या (5 जुलै) वरळीला डोम सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्रित येतील. लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले असून या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित तयारी करत आहे. उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल. एक भाषा म्हणून, संस्कृती म्हणून मराठी माणसाचा एक जोडीचा आणि एकजुट शक्य झाली ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन. हिंदी सक्ती विरोधात आंदोलन झाल आणि उद्या आपण पाहाल काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे. असं सूचक वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

रामदास कदम काय बोलत आहेत, अमुक काय बोलत आहे, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जर एकत्र आला आहे. पोटाचा भीती गोळा आल्यानं मिंधे गटाच्या पाच पंचवीस टाळक्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधु एकत्र आलेलं नकोय, मिंधे गटाचे राजकीय भविष्यात खतम होत आहे. या भीतीपोटी त्यांना या अशा कल्पना सुचत आहेत. चार आण्याची भांग मारली की त्यांना या कल्पना सूचतात, असे म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे.

दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधु उद्या एकत्र मंचावर दिसणार आहे. या विजयी मेळाव्याची रूपरेषा ठरली असून उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असा असेल. मराठी माणसाच्या लढ्यात आणि विजयी मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करू आणि येणाऱ्या प्रत्येकाचं योगदान यात आहे, असं देखील आम्ही मान्य करू. असेही संजय राऊत म्हणाले.

सर्व कार्यक्रमाचे रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे ती रूपरेषा तुम्हाला आता सांगितले तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का यावा? त्यामुळे उद्या सर्व कळेल. जे येतील त्या सगळ्यांचे स्वागत आम्ही करू. मग ते काँग्रेस नेते असतील, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते असो की डावेपक्ष असतील प्रत्येकाचा आम्ही सन्मानाने स्वागत करू आणि या लढाईत सर्वांचे योगदान आहे हे मान्य करू असेही संजय राऊत म्हणाले.

सर्वप्रथम दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपआपला पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलं आहे.

सोशल मिडीया, बॅनर, जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.
बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत.

गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे.
मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधुंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष / प्रदेशाध्यक्ष यांना स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.
दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष / प्रदेशाध्यक्ष आले तरी मोजक्याच नेत्यांची भाषण होतील.