मुंबई, दि. १३ (पीसीबी) : निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. या सर्वांमध्ये एक मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे, तो म्हणजे अंधेरी पूर्व विधासभा पोटनिवडणुकीचा. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्यापही बीएमसीने मंजूर केला नसल्यानं त्यांना उमेदवारी फॉर्म भरता येणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या वतीने ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्या सध्या मुंबई महापालिकेच्या सेवेत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना राजीनामा देणे आवश्यक आहे. मात्र बीएमसीने अद्यापही त्यांचा राजीनामा मंजूर न केल्यानं अखेर त्यांनी याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र आता त्यासाठी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बीएमसीने अद्यापही त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. याविरोधात आता ऋतुजा लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज अकार वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देणार यावरच त्या निवडणूक लढणार की नाही? हे अवलंबून असल्यानं राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.