ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा सर्वात मोठा दणका

0
20

पिंपरी चिंचवड शहरप्रमुख संजोग वाघेरेंचा राजीनामा


पिंपरी, दि. १८ – ठाकरेंच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोनच दिवसांते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे निवडणूक प्रमुख सचिन भोसले यांनी दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ आता शहरप्रमुख वाघेरे यांनीही पक्ष सोडल्याने शिवसेना हा सर्वात मोठा दणका आहे.

संजोग वाघरेंनी शहराध्यक्ष पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा दिला ,पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघरे दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होणार आहेत. आपण घरगुती कारणास्तव पक्ष सोडत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. प्रत्यक्षात त्यांची पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे यांना भाजपने उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. दिवंगत महापौर भिकु वाघेरे यांच्या अकाली निधनानंतर त्या जागेवर त्यांचे चिरंजीव म्हणून १९९५ मध्ये संजोग यांना संधी मिळाली. पुढे त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले होते. वाघेरे हे स्वतः सलग चार टर्म, तर त्यांच्या पत्नी उषा या तीन टर्म नगरसेवक होत्या. संजोग यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मावळ लोकसभा निवडणुकित शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला.