ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडी चे समन्स

0
314

भाजपने आता रडिचा डाव सुरू केला आहे. मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी वाट्टेल ते असाच फंडा अनुकरला आहे. शिवसेनेने एक तगडा उमेदवार रिंगणात उतरवला तर त्याला थेट ईडी चे समन्स मिळाले आहे. मुंबईतील तमाम मराठी मतदार आता शिवसेना ठाकरे गटाकडे झुकत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने भाजपने उमेदवारांना टार्गेट करायला सुरवात केली आहे. सद्या शिंदे गटात असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव हे उध्दव ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार आहेत. आजवर स्वतः गजानन किर्तीकर यांनी हा मतदारसंघ राखला आहे.
मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे बलाढ्य उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडी चे समन्स आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई वायव्य हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय विविध धर्मीय मतदार आहेत. मागील दोन टर्म पासून या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी एकहाती बाजी मारली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत. तर, दुसरीकडे त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे आता शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार आहेत. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवार जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे गजानन कीर्तीकर यांच्याऐवजी सिद्धेश कदम यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.