ट्रेलरच्या चार बॅटऱ्यांची चोरी

0
189

नवलाख उंब्रे, दि. २८ (पीसीबी) – कंपनीच्या बाहेर पार्क केलेल्या ट्रेलरच्या चार बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार शनिवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता नवलाख उंब्रे येथील जनरल मोटर्स कंपनीच्या बाहेरील बाजूस घडली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

जग्गू प्रभू जाधव (वय 20, रा. माळवाडी, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महारुद्र मल्लिकार्जुन कुरे (वय 27, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रेलरवर चालक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रेलर शनिवारी सकाळी जनरल मोटर्स कंपनीच्या बाहेरील बाजूला सर्व्हिस रस्त्यावर पार्क केला होता. सकाळी दहा वाजताच्या सुमारास जग्गू जाधव याने फिर्यादी यांच्या दोन ट्रेलरच्या 36 हजार रुपये किमतीच्या चार बॅटऱ्या चोरून नेल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.