ट्रेडिंग मध्ये झालेला नफा काढण्याच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

0
96

महाळुंगे, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – ट्रेडिंग मध्ये नफा झाला आहे, असा खोटा इलेक्ट्रोनिक अभिलेख तयार करून तो काढून घेण्यासाठी महिलेकडून 22 लाख 65 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 एप्रिल ते 13 जून या कालावधीत खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार meta go rade.com या ट्रेडिंग प्लेटफॉर्म वरील ग्रुप कन्सलटंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला सोशल मिडियावरील एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावाने सिल्व्हर मेंबरशीप घेण्यास लाऊन त्यांच्या ट्रेडिंग खात्यावर जास्तीत जास्त नफा मिळतो आहे, असे दाखवले. फिर्यादी यांच्या खात्यावर 36 लाख 84 हजार 266 रुपये रक्कम जमा झाली असल्याचा खोटा इलेक्ट्रोनिक अभिलेख आरोपींनी तयार केला. ती रक्कम काढण्यासाठी फिर्यादीकडून 22 लाख 65 हजार 23 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.