ट्रेडिंगच्या बहाण्याने महिलेची 18 लाखांची फसवणूक

0
94

पिंपरी, दि.९ (पीसीबी) –सांगवी, दि. 9 (प्रतिनिधी)
ट्रेडिंगच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची 18 लाख 12 हजार 436 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 मार्च ते 27 मे या कालावधीत सांगवी परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 918582855517 क्रमांक धारक आणि बँक खाते धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस सोशल मिडियावरून संपर्क केला. सोशल मिडीयावर ट्रेडिंगची जाहिरात देऊन पैसे गुंतवणूक केल्यास 25 ते 30 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 18 लाख 12 हजार 436 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.