ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
68

भोसरी, दि. 28 (पीसीबी) : ट्रॅक्टरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 24 ऑक्टोबर रोजी धावडे वस्ती भोसरी येथे घडला.

रामदास बाळू टिळेकर (वय 39) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी निलेश बाळासाहेब टिळेकर (वय 36, रा. माळवाडी, देहू) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर (एमएच 14/जेयु 9942) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ रामदास टिळेकर हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांना पाठीमागून एका ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात रामदास यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. अपघाताची माहिती ट्रॅक्टरच्या मालकाला मिळाल्यानंतर देखील त्याने पोलिसांना माहिती दिली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.