ट्रायल घेणाऱ्या फिटरने रिक्षा केली पलटी

0
8

निगडी,दि. २१ (पीसीबी)
रिक्षा दुरुस्त झाल्यानंतर रिक्षा मालकाला घेऊन ट्रायल घेण्यासाठी गेलेल्या फिटरने रिक्षा पलटी केली. यामध्ये रिक्षा मालक जखमी झाला आहे. ही घटना १७ जानेवारी रोजी सायंकाळी परशुराम चौक, निगडी येथे घडली.

समाधान भास्कर आवारे (वय ४०, रा. थेरगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिटर साहिल गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची रिक्षा निगडी येथील श्री सेवा बजाज कंपनीच्या शोरूम मध्ये दुरुस्तीसाठी दिली होती. शोरूम मधील फिटर साहिल याने फिर्यादी आवारे यांना घेऊन रिक्षाची दुरुस्ती झाल्यानंतर रिक्षाची ट्रायल घेण्यासाठी रिक्षा नेली. परशुराम चौकात रिक्षा पलटी झाली. त्यामध्ये आवारे हे जखमी झाले तसेच रिक्षाचे नुकसान झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.