ट्रान्सपोर्ट नगर मधून पिस्टलसह एकाला अटक

0
514

निगडी, दि. २१ (पीसीबी) – निगडी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर मधून दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) करण्यात आली.

सुवेंद्र राकेश चौधरी (वय 18, रा. कान्हे फाटा, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार शिवजयंती निमित्त गस्त घालत असताना पोलीस अंमलदार गणेश कोकणे आणि अमर कदम यांना माहिती मिळाली की, निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक तरुण पिस्टल घेऊन आला आहे.

त्यानुसार, सहायक फौजदार महेश खांडे, पोलीस अंमलदार उमेश पुलगम, नितीन लोखंडे, सागर शेडगे, अमर कदम, समीर रासकर यांनी ट्रान्सपोर्ट नगर येथे जाऊन सापळा लावत सुवेंद्र चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.